गुगल ऍडसेन्स म्हणजे काय?
नमस्कार, मित्रानो
Google AdSense हे नाव वारंवार कानावर पडतेय. आम्ही डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात वावरत असल्याने अनेक ऑनलाईन ग्राहक गुगल ऍडसेन्स म्हणजे काय? हा प्रश्न नेहमी विचारतात. काव्यशिल्प डिजिटल मीडियाकडे अधिकांश ग्राहक न्यूज पोर्टलधारक असल्याने ते आमच्या पोर्टलला जाहिराती मिळलीत काय, असा प्रश्न देखील करतात… होय, तुमच्या पोर्टलला गूगलच्या जाहिराती मिळू शकतात. त्यासाठी काही गोष्टी नीट समजून घ्या.
काव्यशिल्प डिजिटल मीडियाने मराठी माणसांसाठी गुगल ऍडसेन्स म्हणजे काय? हा वृत्तांत अगदी सोप्या शब्दात सांगितलेला आहे. आपण जेव्हा एखाद्या वेबसाईटला भेट देतो तेव्हा त्यात आपल्याला काही जाहिराती दिसतात. या जाहिराती आपण पाहिल्यावर अथवा यावर क्लिक केल्यावर त्याचे पैसे त्या वेबसाईटच्या मालकाला मिळतात. अनेक ब्लॉगर यातूनच महिन्याला लाखो रुपये कमवतात.
२००३ साठी गुगलने ऍडसेन्स हि सुविधा सुरु केली होती. गुगल ऍडसेन्स आता मराठीसाठी देखील सुरु झाले आहे. ” पैसे मिळतील ” ह्या विचाराने आपण पोर्टल सुरु करत असतो, ऑनलाईन पैसे कमवणे फार काही कठीण नाही. बरेच लोक इंटरनेट च्या साहायाने पैसे मिळवत आहेत. पण याचा अर्थ असा नाही की आपण पोर्टल सुरु केला आणि पैसे मिळू लागले. पण, चांगले प्रयत्न केले तर आपण २०-२५ हजार मिळवू शकतो.
आपण पोर्टल बनवल्या नंतर ऍडसेन्सला नोंदणी करावी लागते, ऍडसेन्स हे गूगलची एक प्रमुख advertising company आहे. अनेक मोठे मोठे ब्लॉगर्स आणि पोर्टलधारक ऍडसेन्सच्या मदतीने महिन्याचे २-३ लाख मिळवत आहेत. पण, हे Google AdSense सुरु कसे करायचे हे बघू शकता.
AdSense सोबत सुरुवात करण्यासाठी तुम्हाला फक्त तीन गोष्टींची गरज आहे
1. Google खाते
तुम्ही Gmail किंवा इतर कोणतीही Google सेवा वापरत असल्यास, त्यांपैकी एक तुमच्याकडे आधीच एक खाते आहे. तसे नसल्यास, साइन अप करण्यासाठी फक्त क्लिक करा आणि नवीन खाते तयार करण्यात आम्ही तुम्हाला मदत करू. ते तुम्हाला AdSense आणि Google मधील सर्व गोष्टींचा अॅक्सेस देते.
2. फोन नंबर आणि मेल अॅड्रेस
तुम्हाला पैसे देता यावेत म्हणून तुमच्या बँक खात्याशी संबंधित तुमचा फोन नंबर आणि मेल अॅड्रेस.
3. तुमची साइट AdSense शी कनेक्ट करा
तुमच्या साइटवर फक्त एक कोड जोडा आणि Google इतर सर्व गोष्टींची काळजी घेईल. यामुळे तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवता येईल. तुम्हाला तुमच्या वेबसाइटमध्ये फक्त एक लहानसा AdSense कोड टाकावा लागेल आणि तो तात्काळ काम करू लागेल.
२० लाख लोकांनी AdSense निवडले आहे, त्याची कारणे ही आहेत
तुमच्या साइटवरून पैसे मिळवा
तुमच्या साइटवरील जाहिरातीच्या जागेसाठी लाखो जाहिरातदार स्पर्धा करतात. याचा अर्थ आणखी सुसंबद्ध जाहिराती आणि जास्तीत जास्त भरलेल्या जाहिरातीच्या जागा.
मोबाइलसाठी ऑप्टिमाइझ केलेल्या जाहिराती
डेस्कटॉप किंवा मोबाइलवर आपोआप बसवण्यासाठी Google तुमच्या जाहिरात युनिटचा आकार ऑप्टिमाइझ करू शकते, त्यामुळे जाहिरात पाहिली जाण्याची आणि त्यावर क्लिक केली जाण्याची शक्यता वाढते.
वेळ वाचवा
तुमच्या साइटवर कोडचा एक भाग जोडा आणि Google आपोआप तुमच्या साइटच्या लेआउटसाठी खास तयार केलेल्या जाहिराती दाखवेल, ज्यामुळे तुमचा जाहिरात कोडमध्ये बदल करण्याचा वेळ वाचेल.
AdSense वरून तुम्हाला किती कमाई करता येते ?
मासिक पेजव्ह्यू- 50,000 इतकी असेल तर
तुमची संभाव्य वार्षिक कमाई- 3432 रुपये कमाई होऊ शकते
स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर पाहिल्या जात असतानादेखील, जाहिराती उच्च गुणवत्तेच्या आणि तुमच्या आशयाशी किंवा प्रेक्षकांशी सुसंगत आहेत याची खात्री करण्यासाठी त्यांची छाननी केली जाते. परिणाम? तुम्ही ऑनलाइन आणखी पैसे मिळवू शकता.
AdSense वापरणार्या लोकांकडून प्रेरणा घ्या.
धन्यवाद!